मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टीम इंडियाचा स्टार फास्ट बॉलर मोहम्मद शमीसह विविध खेळातील 26 खेळाडूंना आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. मोहम्मद शमीने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये शानदार गोलंदाजी केली होती. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संध अंतीम फेरीत पोहोचला होता. त्याच्या याच कामगिरीची दखल घेत त्याला सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी शमीची आईही राष्ट्रपती भवनात उपस्थित होती. जेव्हा शमी हा पुरस्कार स्वीकारत होता, तेव्हा आई आपल्या मुलाकडे अभिमानाने पाहत होती.
या पुरस्काराविषयी NIA शी बोलताना मोहम्मद शमीने सांगितले की, “हा पुरस्कार एका स्वप्नासारखा आहे, आयुष्य निघून जाते तरी लोकांना हा पुरस्कार मिळत नाही. मला हा पुरस्कार मिळत आहे याचा मला आनंद आहे. यासाठी मी खूप मेहनत केली आहे. आता माझे स्वप्न पुर्ण झाले आहे. आगामी काळात स्वत:ला फिट ठेवणे हे माझे लक्ष्य आहे.”
मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा अर्जुन पुरस्काराने सन्मान होणारा 58 वा क्रिकेटपटू आहे. याआधी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, इशांत शर्मा यांच्यासह मिताली राज, स्मृती मंधाना, अंजुम चोपड़ा, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा या महिला क्रिकेटपटूंनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2022 मध्ये कोणताही क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला नव्हता.
- अर्जुन पुरस्कार मिळालेले इतर खेळाडू
- ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
- आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
- मुरली श्रीशंकर (ॲथलेटिक्स)
- पारुल चौधरी (ॲथलेटिक्स)
- मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
- आर वैशाली (बुद्धिबळ)
- अनुष अग्रवाला (घोडेस्वारी)
- दिव्यकृती सिंग (घोडेस्वारी)
- दीक्षा डागर (गोल्फ)
- कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
- सुशीला चानू (हॉकी)
- पवन कुमार (कबड्डी)
- रितू नेगी (कबड्डी)
- नसरीन (खो-खो)
- पिंकी (लॉन बाऊल्स)
- ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
- ईशा सिंग (शूटिंग)
- हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
- अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
- सुनील कुमार (कुस्ती)
- अंतीम पंघल (कुस्ती)
- नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
- शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
- इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
- प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)
SL/KA/SL
9 Jan. 2024