२६/११ चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला गुरूवारी अखेर १८ दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. तहव्वूर राणाला पटियाला हाऊस NIAच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर त्याला १८ दिवसांची कोठडी बजावण्यात आली. राणाला गुरुवारी भारतात आणले गेले. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आणि त्याला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे,