आज परदेश प्रवासाची पंचवीशी पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि १
काँग्रेसचे वरिष्ठ नेते, कामगार नेते महेंद्र घरत यांना गेल्या 25 वर्षाचा आलेला अनुभव त्यांनी परदेशवारीची 25 वर्षे या पुस्तकातून व्यक्त केला असून या पुस्तकाचे प्रकाशन दोन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सिद्धिविनायक बँक्वेट हॉल,शेलघर येथे होणार आहे. घरत यांना परदेशवारीची 25 वर्षे गेली पंचवीस वर्ष राजकीय, कामगार क्षेत्रा बरोबरच मित्र, सहकारी, परिवार, नातेवाईक यांच्या सोबत परदेश प्रवास करण्याचा योग आला. पंचवीस वर्ष परदेश प्रवासातील आठवणींना उजाळा देण्यासाठी व ते अविस्मरणीय क्षण साठवून ठेवण्यासाठी परदेश प्रवासाची पंचवीशी पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार जयंत पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी आपण या पुस्तक प्रकाशन सोहळयासाठी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक कामगार नेते महेंद्र घरत यांनी केले आहे. KK/ML/MS