डोंबिवली स्फोटाच्या ठिकाणी सापडले 25 ते 30 मानवी अवशेष

 डोंबिवली स्फोटाच्या ठिकाणी सापडले 25 ते 30 मानवी अवशेष

डोंबिवली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाला आज नऊ दिवस उलटले आहेत. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही 9 जण अजूनही बेपत्ता असल्याची महिती आहे. मात् आता घटनास्थळी जवळपास 25 ते 30 मानवी अवशेष मिळाले आहेत. त्याची अजून डीएनए तपासणी झाली नाही. त्यामुळे बेपत्ता असलेल्यापैकी किती जण मृत आहेत याचा अधिकृत आकडा जरी समोर आला नसला तरी मृतांची संख्या मात्र मोठी आहे हे स्पष्ट झालं आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवी अवशेष सापडल्याने मृतांच्या संख्येत मात्र मोठी वाढ होणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

अजूनही कंपनीतून धुराचे लोट निघताना दिसत आहेत. अशातच कंपनीच्या खाली केमिकलच्या ड्रम्सचा साठा असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे. तर केमिकलच्या साठ्यामुळे कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं दिसत आहे.

डोंबिवली स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे. मात्र जे कामगार अद्याप बेपत्ता आहेत त्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. जर शासनाने विशेष बाब म्हणून परिपत्रक काढलं तर बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत मिळू शकते. अन्यथा बेपत्ता झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सात वर्ष मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

SL/ML/SL
30 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *