TATA कंपनीमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण

 TATA कंपनीमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या उद्योगविश्वाचा पाया रचणारा टाटा समूह नेहमीच सामाजिक बांधिलकी पाळत नवीन पायंडे पाडण्यात अग्रेसर असतो. असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय आता टाटा समूहाने घेतला आहे. टाटा समूहाच्या दिग्गज टाटा स्टील या कंपनीने गेल्या शंभर वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी महिल्यांसाठी आरोग्य सेवा, कार्यालयांमध्ये पाळणाघर आणि भविष्य निर्वाहनिधी यासारख्या सुविधा देण्यास सुरुवात केली असून आता कंपनीने समाजातील इतर घटकांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

टाटा स्टील लिमिटेड समाजातील ठराविक समुदायांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यावर भर देणार असून एक प्रकारे कंपनी समाजातील काही विशिष्ट लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये २५ टक्के ‘आरक्षण’ देणार आहे. टाटा स्टील ट्रान्सजेंडर प्रतिभांना कामावर घेण्यासाठी विशेष भरती मोहीम सुरू करणारी देशातील पहिली कंपनी असल्याचा एका अधिकाऱ्याने दावा केला. कंपनीत सध्या उत्पादन, संचालन आणि देखभाल, उत्खनन आणि सेवा विभागांमध्ये ट्रान्सजेंडर समुदायातील ११३ लोक कार्यरत असून

टाटा स्टीलने म्हटले की कंपनी लिंग अल्पसंख्याक (LGBTQ+), अपंग आणि वंचित समुदायातील लोकांना एकूण कार्यबलामध्ये २५% जागा देईल. येत्या काही वर्षांत हे काम पूर्ण होईल. विशेष म्हणजे की टाटा स्टीलने काही वर्षांपूर्वीच आपल्या झारखंडच्या जमशेदपूर येथील कारखान्यात LGBTQ+ समुदायातील लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या सर्व नोकऱ्या कारखान्याच्या शॉप फ्लोअरवर देण्यात आल्या.

टाटा स्टीलच्या मोहिमेविषयी बोलताना कंपनीचे मुख्य विविधता अधिकारी जयसिंग पांडा म्हणाले की “आम्ही कामाची जागा विकसित करण्यावर विश्वास ठेवतो जिथे प्रत्येक लिंगाच्या लोकांना मौल्यवान, आदर आणि सशक्त वाटेल. विविधता आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही मोहीम सुरू ठेवल्याने दीर्घकालीन यश मिळण्याची खात्री आहे, हीच नाविन्यपूर्णतेची गुरुकिल्ली आहे.”

SL/ML/SL

27 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *