मालाड मध्ये 25 बांधकामे हटवली
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मालाड मधील वाहतूक समस्येचा निपटारा करण्यासाठी महापालिकेने धडाक्यात काम सुरू केले असून, मालाड पठाणवाडी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरू शकणारी १५२ बांधकामे हटविण्याचे काम पालिकेने आज हाती घेतले . यापैकी ८१ बांधकामे योग्य त्या मोबदल्यासाठी पात्र ठरली असून २५ बांधकामे काढण्यात आली आहे . उद्या देखील ही कारवाई सुरू राहणार आहे.25 constructions removed in Malad
पठाणवाडी रस्त्याचे १८.३० मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. या रुंदीकरण रेषेत सुमारे १५२ बांधकामे अडथळा ठरत आहेत. ही सर्व बांधकामे प्रक्रियेनुसार हटविण्याची कार्यवाही आजपासून सुरू करण्यात आली . या १५२ पैकी ८१ बांधकामे नियमानुसार योग्य त्या मोबदल्यासाठी पात्र ठरली आहेत. सदर बांधकामे काढण्याच्या प्रक्रिये अंतर्गत आज सुमारे २५ बांधकामे काढण्यात आली. त्यासाठी तीन जेसीबी संयंत्र, दोन डंपर, तीस कामगार आणि आठ अभियंते प्रत्यक्ष कार्यवाहीच्या ठिकाणी कार्यरत होते.
दरम्यान, पात्रता धारकांना त्यांचा मोबदला मिळाल्यानंतर ती बांधकामे देखील तातडीने हटविली जातील. त्यानंतर महापालिकेच्या रस्ते विभागामार्फत या रस्त्याचे रुंदीकरण व विकास काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली .
ML/KA/PGB
1 Feb. 2023