२४ तृतियपंथींनी केले विष प्राशन

 २४ तृतियपंथींनी केले विष प्राशन

इंदौर, दि. १६ : .येथील नंदलालपुरा क्षेत्रात चालू असलेल्या तृतियपंथींमधील वादात एका गटातील सुमारे २४ तृतियपंथींनी विष प्यायले आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितली जात आहे. विष प्यायल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर अवस्थेत तृतियपंथींना रुग्णालयात दाखल केले. अॅडिशनल डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की प्राथमिक तपासात फिनायल प्यायचे असल्याची बाब समोर आली आहे.

२४ तृतियपंथींवर एमवाय रुग्णालयात उपचार चालू आहेत. सीएमएचओ यांना सूचना देण्यात आल्या आहेत की सर्व तृतियपंथींवर योग्य ते उपचार केले जात आहेत. सांगण्यात आले की रुग्णांची स्थिती स्थिर आहे आणि सतत पोलिस प्रशासनाच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. विषारी पदार्थ का प्यायले याबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी केली जात आहे. काही काळापूर्वीच या परस्परविरोधी वादात दोन मीडियाकर्मींनी एका तृतियपंथीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले होते. अनेक दिवसांपासून चालू असलेल्या या तृतियपंथींच्या वादात पूर्वी एसआयटी गठित झाली होती.

SL/ML/SL 16 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *