डंकी मार्गाने अमेरिकेत घुसणारे २३ हजार भारतीय अटकेत
नवी दिल्ली, दि. ३१ : अमेरिकेच्या आकर्षणामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकेत डंकी मार्गाने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात गेल्या एका वर्षात दररोज ६५ भारतीय पकडले गेले. जानेवारी ते डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकन बॉर्डर अँड कस्टमने एकूण २३,८३० भारतीयांना पकडले.
विभागाच्या मते, प्रवेशाची प्रकरणे कमी झाली आहेत, परंतु त्यावर पूर्णपणे आळा बसलेला नाही. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात २०२४ मध्ये एकूण ८५,११९ भारतीय पकडले गेले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावेळी एक नवीन ट्रेंडही समोर आला आहे. अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेलेले सर्व भारतीय सिंगल एंटिटी म्हणजे एकटेच होते.
कोणताही भारतीय कुटुंबासोबत पकडला गेला नाही. तर २०२४ मध्ये पकडलेल्या भारतीयांपैकी सुमारे २० हजार भाऊ, पत्नी किंवा मुलांसोबत अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करत होते. तसेच, अमेरिकेत कॅनडा आणि मेक्सिको सीमेऐवजी आता तुर्कस्तान-दुबई मार्गाने बेकायदेशीर प्रवेशाची प्रकरणे समोर येत आहेत.
SL/ML/SL