237 वर्षाची परंपरा असलेल्या मस्कऱ्या (हडपक्या) गणेशाचे विसर्जन
नागपूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 237 वर्षाची परंपरा असलेल्या महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट मस्कऱ्या अर्थात हडपक्या गणेश उत्सव मंडळ, नागपुरातील भोसले राजे कुटुंबातील पितृपक्षात बसविण्यात येणाऱ्या मस्कर्या गणपतीचं विसर्जन करण्यात आले. वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. बंगाल वर विजय मिळविल्यानंतर तत्कालीन भोसले राजे जेव्हा नागपुरात दाखल झाले तेव्हा गणपती उत्सव संपला होता आणि राजांना उत्सव साजरा करायचा असल्याने त्यावेळी त्यांनी मस्कर्या गणपती ची स्थापन केली तेव्हा पासून आज पर्यंत ही परंपरा सुरू आहे , पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी या बाप्पा ची स्थापना होते आणि पितृपक्ष च्या शेवटच्या दिवशी त्याच विसर्जन करण्यात येते.
ML/ML/SL
1 Oct 2024