नाशिकच्या कांदा निर्यांतीमुळे परकीय चलनात २३५५ कोटींची भर

 नाशिकच्या कांदा निर्यांतीमुळे परकीय चलनात  २३५५ कोटींची भर

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  दर्जेदार कांदा  उत्पादनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्याने गत हंगामात  कांदानिर्यांतीतून मिळालेल्या भरघोस परकीय चलनामुळे  देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणिय भर घातली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत तब्बल 13 लाख ५४ हजार 791 मेट्रीक टन कांदा निर्यात झाली आहे. यामुळे देशाला २३५५ कोटी एवढे परकीय चलन मिळाले आहे.शेतकऱ्यांनी कमी कालावधीत दर्जेदार कांद्यांचे उत्पादन घेतल्यामुळे हे यश मिळाले आहे.

देशात दरवर्षी 200 दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होते. यांपैकी 90 टक्के कांदा देशातच वापरला जातो. तर उर्वरीत निर्यात केला जाते. कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा देशाच प्रथम क्रमांक लागतो.  प्रामुख्याने बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, युएई, कतार, हॉंगकॉंग, कतार, कुवेत या देशांना भारतातून कांदा निर्यात केली जाते.

SL/KA/SL

3 Jan. 202

2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *