पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये २३ जणांची गोळ्या झाडून हत्या
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पंजाबहून आलेल्या बसमधील प्रवाशांना खाली उतरवून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्याचा प्रकार आज घडला. पाकिस्तानच्या मुसाखेलमधील राराशम जिल्ह्यात ही घटना घडला. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताकडे जाणाऱ्या व पंजाब प्रांतातून येणाऱ्या बसेसला हल्लेखोर प्रामुख्याने लक्ष्य करत आहेत. या बसेसची तपासणी हल्लेखोरांकडून केली जात आहे. त्यानंतर फक्त पंजाब प्रांतातून आलेल्या नागरिकांना गोळ्या घातल्या जात आहेत.आज हत्या करण्यात आलेल्या २३ जणांपैकी तिघेजण बलुचिस्तानचेच होते, तर उर्वरीत २० जण हे पंजाब प्रांतातले होते. या प्रकाराचा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ व राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी निषेध केला आहे.