मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी खारफुटीची 22 हजार झाडे तुटणार

 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी खारफुटीची 22 हजार झाडे तुटणार

मुंबई,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकास आणि पर्यावरण यांच्या द्वंद्वामध्ये अनेकदा पर्यावरणाची पिछेहाट होते असे दिसून येते. देशातील पहिली बुलेट ट्रेन असणाऱ्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या नियोजित मार्गात येणारी खारफुटीची झाडांवर आता कुऱ्हाड पडणार आहे. ही बुलेट ट्रेन सार्वजनिक हिताची असल्याने न्यायालयाने या वृक्षतोडीला परवानगी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला (NHSRCL) मुंबई आणि शेजारील पालघरसह ठाणे जिल्ह्यांतील सुमारे 22,000 खारफुटीची झाडे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तोडण्याची परवानगी दिली. मात्र यासाठी काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागणार आहे. ( Mumbai- Ahamadavad Bullet Train )

 ‘खारफुटी तोडण्याच्या बदल्यात पर्यावरण जतनाच्या दृष्टीने केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) घालून दिलेल्या अटी व शर्तींचे कंपनीला पूर्णपणे पालन करावे लागेल’, असे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

एनएचआरएससीएलचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी न्यायालयाला माहिती दिली की प्रकल्पासाठी तोडण्यात येणार्‍या खारफुटीच्या झाडांची संख्या 50,000 वरून 22,000 पर्यंत कमी करण्यात आली आहे. परांजपे यांनी आश्वासन दिले होते की NHSRCL तोडल्या जाणाऱ्या एकूण झाडांच्या पाचपट वृक्षारोपण करेल.

ML/KA/SL

10 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *