भारतात होणार २२ अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

 भारतात होणार २२ अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली, दि. २१ : Arab League मधील परराष्ट्र मंत्र्यांची भारतात बैठक होणार आहे. या लीग मधील 22 सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होतील अशी शक्यता आहे. हे एक उच्चस्तरीय सम्मेलन आहे. पश्चिम आशियात सुरु असलेलं युद्ध आणि अस्थिरता या दरम्यान ही बैठक होत आहे. भारताचं वाढतं कूटनितीक महत्व यातून अधोरेखित होतं.

सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, कतर, कुवैत, ओमान, बहरीन, जॉर्डन, इराक, लेबनान, सीरिया, मोरक्को, ट्यनीशिया, अल्जिरिया, लीबिया, सूडाना, सोमालिया, जिबूती, मॉरिटानिया, कोमोरोस, येमेन आणि पॅलेस्टाइन या देशांचे परराष्ट्र मंत्री भारतात होणाऱ्या या बैठकीत सहभागी होऊ शकतात.

भारत आपल्या 80 टक्क्यापेक्षा पण अधिक कच्चा तेलाची गरज आयातीतून पूर्ण करतो. यात 60 टक्के तेल पुरवठा अरब देशांमधून होतो. तेल पुरवठ्यातील कुठल्याही अडथळ्याचा थेट परिणाम महागाई आणि रुपयावर होतो. अशा स्थितीत ही बैठक भारताच्या एनर्जी सिक्योरिटी डिप्लोमेसीच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *