महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू

 महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू

नवी मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात भर तळपत्या उन्हात सहभागी होण्यासाठी आलेल्या सुमारे 13 जणांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागला आहे.हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अनेक जण गंभीर असून त्यांना आयसीयूत भरती करण्यात आले आहे. सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. यापैकी काहींना खारघर सेंट्रल पार्कजवळील टाटा हॉस्पिटलमध्ये, तर काहींना पनवेल परिसरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आप्पा साहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क येथे एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यासपीठावरून उष्णतेचा उल्लेख केला होता, तरीही लोकांना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. तापमान 42 अंशांच्या आसपास होते ज्याचा उल्लेख खुद्द अमित शहा यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता.

लाखोंच्या जमावामुळे वातावरणातील आर्द्रता आणखी वाढली होती. त्यातच कार्यक्रम संपताच चेंगराचेंगरी देखील झाली. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी असंख्य श्री सदस्य शनिवारपासून मैदानात ठाण मांडून बसले होते, रविवारी हा कार्यक्रम दुपारी दीडच्या सुमारास संपला आणि त्यानंतर हे सर्व तिथून बाहेर पडले , त्यालाही आणखी तीन तासांहून अधिक वेळ लागला होता.

या प्रचंड तळपत्या उन्हात सहभागी होण्यासाठी आलेल्या या श्री सदस्यांनी आपापल्या छत्र्या , टोप्या , पाणी , खाणे आणले होते, त्यांच्यासाठी अनेक वैद्यकीय कक्ष डॉक्टारांसह उपलब्ध होते, मात्र असे असूनही या सरकारी सोहळ्यात वीस जणांचा बळी गेला आहे. मुळातच हा कार्यक्रम आग ओकणाऱ्या उन्हात भर दुपारी का आयोजित करण्यात आला याचे उत्तर कोणीच देत नाही.

ही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेटी घेऊन रुग्णांशी संवाद साधला, इतर अनेक पक्षांचे पदाधिकारी, नेते देखील येऊन भेटून गेले मात्र ज्यांच्यासाठी हे श्री सदस्य तिथे आले होते त्या धर्माधिकारी यांच्या कुटुंबियां पैकी कोणीही काल रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात आलेले नव्हते.

ML/KA/SL

17 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *