ITI मध्ये सुरु होणार २० नविन अभ्यासक्रम

 ITI मध्ये सुरु होणार २० नविन अभ्यासक्रम

मुंबई, दि. ७ : राज्यात “मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड”योजना राबविण्यात येणार आहे.विविध तंत्रशिक्षण प्राप्त ३० लाख युवक-युवतींची शासनाकडे नोंद आहे. या सर्वांना ईमेल करून त्यांची AI व्दारे परीक्षा घेण्यात येईल.यामध्ये पाच लाख युवक-युवतींना विविध परिक्षांती निवडण्यात येईल.यातुन पुन्हा चाळणी करून १ लाख उमेदवारांची निवड मूल्यांकन चाचण्या,स्पर्धा व हॅकाथॉनच्या माध्यमातून केली जाईल. अंतिम टप्प्यात २५,००० निवडक उमेदवारांना त्यानंतर तांत्रिक सहाय्य, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक, स्टार्टअप्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर ITI मध्ये तांत्रिक शिक्षणासोबत इतर अनुषंगिक व्यक्तीमत्व विकासाचे २० अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत,असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. अर्बन सिटी एरियाज- को-ऑप. हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट कोर्स,कोस्टल रिजन – फिश प्रोसेसिंग,ऑर्नामेंटल फिशरीज,अ‍ॅग्रिकल्चरल बेल्ट -अ‍ॅग्रो प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग टेक्निशियन हे देखील कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करता येतील.

  • नवीन अभ्यासक्रम आणि कालावधी
  • व्यवस्थापन क्षेत्रातील बिझनेस अ‍ॅनालिटिक्स हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम,
  • मार्केटिंग मॅनेजमेंट तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम,
  • प्रॉडक्शन मॅनेजमेंट साडे तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम,
  • फायनान्शियल मॅनेजमेंट तीन महिने कालावधी,
  • बिहेव्हियरल मॅनेजमेंट साडे तीन महिने कालावधींचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
  • सॉफ्ट स्किल्स मध्ये अ‍ॅडव्हान्स्ड कम्युनिकेटिव इंग्लिश अ‍ॅण्ड प्रोफेशनल स्किल्स ट्रेनर तीन महिने कालावधी,
  • फंडामेंटल्स ऑफ कॉन्टेन्ट रायटिंग तीन महिने,
  • कम्युनिकेटिव इंग्लिश ट्रेनर तीन महिने,
  • पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ग्रूमिंग साडे तीन महिने,
  • कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (CRM) तीन महिने
  • सेवा क्षेत्रातील अभ्यासक्रम अ‍ॅडव्हान्स्ड कोर्सेस इन गार्डनिंग साडे तीन महिने,
  • इलेक्ट्रिशियन अ‍ॅण्ड प्लम्बिंग तीन महिने,
  • नर्सिंग तीन महिने,
  • फ्रंट डेस्क कोऑर्डिनेटर तीन महिने,
  • हाउसकीपिंग सुपरवायझर साडे तीन महिने
  • काळानुरूप विशेष अभ्यासक्रमामध्ये AI मशीन लर्निंग डेव्हलपरचा तीन महिने कालावधीचा
  • ,सोलर पॅनल इन्स्टॉलेशन अ‍ॅण्ड मेंटेनन्स साडे तीन महिने,
  • ड्रोन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ऑपरेशन्स तीन महिने,
  • ईव्ही मेकॅनिक साडे तीन महिने,
  • इंडस्ट्रियल रोबोटिक्स अ‍ॅण्ड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन चार महिने कालावधी

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *