या देशांतून भारतीयांनी मायदेशी पाठवले २.७४ लाख कोटी

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोकरीच्या निमित्ताने आता लाखो भारतीय अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये वास्तव्य करत आहेत. या व्यक्तींकडून भारतात पाठवल्या जाणाऱ्या पैशामुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते.यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला पाठबळही मिळते. गेल्या वर्षी अमेरिका व ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय मायदेशात पैसे पाठवण्यात अव्वल ठरले आहेत. गेल्या वर्षी या दोन्ही देशातील भारतीयांनी २.७४ लाख कोटी रुपये भारतात पाठवले. यात १.९१ लाख कोटी अमेरिकेतून, तर ८३ हजार कोटी ब्रिटनमधून पाठवले. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, आगामी ५ वर्षांत दोन्ही देशातून भारतात पाठवली जाणारी रक्कम दुप्पट होईल. 2.74 lakh crores were sent home by Indians from these countries
पैसे पाठवण्याच्या बाबतीत भारतीयांनी अरब देशांना मागे टाकले आहे. येथून केवळ २.३३ लाख कोटीच भारतात आले. भारताच्या उच्च कौशल्य व्यावसायिकांपैकी ४८% अमेरिका-ब्रिटनमध्ये आहेत. उच्च शिक्षणासाठी अमेरिका-ब्रिटनला जाणारे भारतीय ५ वर्षांत १२% वाढले. पाच अरब देशांत भारतीयांची संख्या कामगार वर्ग आणि मिड स्किल वर्कर्स म्हणून जास्त आहे.
गेल्या पाच वर्षांत यूएई, संयुक्त अरब अमीरात, कुवेत, ओमान, कतार या अरब देशातून भारतात येणारे रेमिटन्स २६% घटत २८% इतकेच राहिले. तर अमेरिका-ब्रिटनमधून १०% वाढ होत ते ३६% इतके झाले आहे.
SL/KA/SL
27 Oct. 2023