साखर कारखान्यांनी थकवली शेतकऱ्यांची २.५ हजार कोटींची FRP

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल निर्मितीला घातलेला लगाम आणि साखर निर्यातीवरील बंधनांमुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. राज्यातील २०६ पैकी ११४ कारखान्यांनी दोन हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आहे. केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीचा आवळलेला लगाम, साखर निर्यातीवरील बंधनं आणि साखरेचा किमान विक्री दरात वाढ न केल्यानं कारखान्यांची आर्थिक कोंडी झालीय. राज्यातील साखर कारखाने एफआरपीची रक्कम देण्यासाठी कर्ज काढत आहेत.
राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना कर्ज दिलं जातं. त्यासाठी तारण साखर असते. पण बाजार साखरेचे दर कमी झाल्यामुळं साखरेच्या मूल्यांकनात प्रति क्विंटल १०० रुपये कपात केलेत. तर दुसरीकडे इथेनॉल निर्मिती आणि साखर निर्यातीवर बंधन आहे. यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील २०६ कारखान्यांनी ८२४ लाख टन उसाचं गाळप केलं. पण ११४ कारखान्यांनी फेब्रुवारी अखेर २ हजार ६५ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचा एफआरपी थकवला आहे.
SL/KA/SL
7 March 2024