बंदी असलेल्या प्रजातीतील 2.4 टन मासे जप्त
पुणे, दि. 29 : उजनी जलाशयात बेकायदेशीरपणे मत्स्यव्यवसाय केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून मोठी कारवाई समोर करण्यात आली आहे. उजनी जलाशयात देशात बंदी असलेल्या आफ्रिकन कॅटफिशची शेती केली जात असल्याचं विभागाच्या लक्षात आलं आहे. तब्बल 2.4 आफ्रिकन कॅटफिश इथे आढळली आहे. या आफ्रिकन कॅटफिशवर देशात बंदी आहे. ही बंदी आतापासून नाही तर 1997 पासून आहे. कारण या आफ्रिकन कॅटफिशमुळे स्थानिक माशांच्या प्रजातींवर मोठं संकट येतं. त्यामुळे या माशांच्या प्रजातीवर बंदी आहे. असं असताना अशाप्रकारच्या माशांच्या प्रजातीची शेती काही मत्स्य व्यवसायिकांकडून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आफ्रिकन कॅटफिश ही प्रजाची स्थानिक माशांच्या प्रजातींसाठी धोकादायक आहे. तसेच पाणथळमधील जैवविधतेवरही त्याचा मोठा परिणाम पडू शकतो. याशिवाय आफ्रिकन कॅटफिश हे कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यातही जगू शकतात. तसेच ही वेगाने वाढणारी प्रजाती आहे. या माशांमुळे स्थानिक मासेमार व्यवसायिकांच्या उपजिवेकरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या माशांच्या प्रजातीची शेती करण्यास वारंवार बंद करण्याचं आवाहन केलं जात होतं.