प्रभाग 194 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषात
मुंबई, 6
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 194 येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली.
या उद्घाटन समारंभास तेजसजी ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत, आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिनभाऊ अहीर तसेच आमदार मिलिंद नार्वेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही लोकांसाठी याआधी काम करत होतो यापुढेही काम करत राहू. मी स्वतः गिरणी कामगारांचा मुलगा असून मला सामान्य नागरिकांच्या समस्या चांगल्यापैकी माहिती आहेत. त्या सोडवण्याचे आम्ही याआधी प्रयत्न केले आहे यांनी यापुढेही करू असे जाहीर प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक 194 चे उमेदवार कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी केले.KK/ML/MS