19 हजार शिक्षण सेवकांना नोकरी टिकविण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा
राज्यातील १९ हजार शिक्षण सेवकांना आता पुन्हा एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षांनी आपसूकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून शिक्षण सेवकांना या निर्णयाचा मोठा झटका बसणार आहे.