परिवहन विभागाच्या ताफ्यात १८७ इंटरसेप्टर वाहने दाखल…

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी परिवहन (RTO) विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या इंटरसेप्टर वाहनांची पाहणी करुन त्यातील सुविधा आणि कार्यप्रणालीची माहिती घेतली. नरिमन पॉईन्ट येथे आयोजित कार्यक्रमास शिक्षण मंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांचेसह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ML/ML/SL
13 March 2024