अमेरिकेकडून भारताला मिळणारा १८२ कोटींचा निधी रद्द

वॉशिग्टन डीसी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांनी भारतातील निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा १८२ कोटी रुपयांचा निधी रद्द केला आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने (DOGE) शनिवारी हा निर्णय घेतला. DOGE ने X वर पोस्ट करून एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विभागाने रद्द केलेले सर्व प्रकारचे खर्च समाविष्ट आहेत. या यादीमध्ये भारतातील मतदार सहभागासाठी निधीचाही समावेश आहे. DOGE ने लिहिले की अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे हे सर्व खर्च रद्द करण्यात आले आहेत.
X ’वरील अधिकृत पोस्टमध्ये, सरकारी दक्षता विभागाने अमेरिकन करदात्याने दिलेल्या निधीच्या पोस्टमध्ये नमूद केलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश होता. “अमेरिकन करदात्याचे डॉलर्स खालील गोष्टींवर खर्च केले जाणार होते, जे सर्व रद्द केले गेले आहेत,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. त्यात पुढे नमूद करण्यात आले आहे, “निवडणूक आणि राजकीय प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी एकूण ४८६ दशलक्ष डॉलर्सची मदत देऊ करण्यात आली होती. त्यात मोल्दोव्हाला २२ दशलक्ष डॉलर्स तर भारतातील मतदानासाठी २१ दशलक्ष डॉलर्स देऊ करण्यात आले होते.” भारतासाठी २१ दशलक्ष अनुदान हे जगभरातील निवडणूक प्रक्रिया बळकट करण्यासाठी ‘कन्सोर्टियम फॉर इलेक्शन्स अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेंथनिंग’ (सीईपीपीएस) च्या व्यापक उपक्रमाचा एक भाग होता. परंतु, या पोस्टमध्ये मदत घेणाऱ्या भारतीय एजन्सीचा किंवा संस्थेचा उल्लेख नाही.
SL/ML/SL17 Feb. 2025