राज्यातील १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजार रुपये अनुदान

 राज्यातील १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजार रुपये अनुदान

मुंबई, दि. २२ : यावर्षी गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिलं आहे. राज्यतील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये भांडवली अनुदान दिलं जाणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिलं जातं.

14 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना भांडवली खर्चासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील अटी व शरतींचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी ५ कोटी रुपये इतकी तरतूद करणे, असा उल्लेख त्या शासन निर्णयात होता.

भजनी मंडळांना 25 हजार रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी https://mahaanudan.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करावे लागतील. याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक 23 ऑगस्ट, 2025 ते 06 सप्टेंबर, 2025 या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *