प्रत्यक्ष कर संकलनात १८ टक्क्यांनी वाढ

 प्रत्यक्ष कर संकलनात १८ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक वर्ष २०२३-२४ नुकताच संपले असून देशाच्या तिजोरीत प्रत्यक्ष कर संकलनात वार्षिक १७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे देशाच्या तिजोरीत १९.५८ लाख कोटी रूपये आले आहेत. जी गेल्या वर्षाच्या अंदाजास पेक्षा जास्त असल्याचे अर्थमंत्रालयाच्या कर विभागाने काल (ता.२१) सांगितले. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात झालेली वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा ७.४० टक्क्यांपेक्षा अधिक असून १.३५ लाख कोटी अधिक आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्रालयाच्या सुधारित अंदाजापेक्षा १३ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष कर जास्त राहिला आहे. प्रत्यक्ष कर संकलनात आयकर आणि कॉर्पोरेट कर संकलनाचा सर्वाधिक वाटा आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) माहितीवरून मंत्रालयाने म्हटले आहे की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन (तात्पुरती) १८.४८ टक्क्यांनी वाढून ती २३.३७ लाख कोटी रूपये झाले आहे. तर परताव्यानंतरचे निव्वळ उत्पन्न १७.७ टक्क्यांनी वाढून १९.५८ लाख कोटी रुपये झाले आहे.

तसेच सीबीडीटीने सांगितले की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३.७९ लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. जो परताव्याच्या तुलनेत २२.७४ टक्के अधिक आहे. यामुळे प्रत्यक्ष कर संकलन (परतावा वगळता) बजेट अंदाजापेक्षा ७.४० टक्के जास्त असून तो सुधारित अंदाजापेक्षा ०.६७ टक्के जास्त आहे.

या कालावधीत, परताव्याच्या समायोजनापूर्वी प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन २३.३७ लाख कोटी होते. जी आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील १९.७२ लाख कोटी रुपयांच्या एकूण संकलनापेक्षा १८.४८ टक्के अधिक आहे. तर मागील आर्थिक वर्षात सकल कॉर्पोरेट कर संकलन (तात्पुरते) १० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १३.०६ टक्क्यांनी वाढून ११.३२ लाख कोटी रुपये झाल्याचे मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सीबीडीटीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन (तात्पुरते) ९.११ लाख कोटी रुपये होते. जे मागील आर्थिक वर्षाील ८.२६ लाख कोटी रुपयांपेक्षा १०.२६ टक्के जास्त आहे. या कालावधीत सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (तात्पुरती) सह एकूण वैयक्तिक आयकर संकलन १२.०१ लाख कोटी रुपये होते. जे गेल्या आर्थिक वर्षातील ९.६७ लाख कोटींच्या संकलनापेक्षा २४.२६ टक्के अधिक आहे. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्ससह निव्वळ वैयक्तिक आयकर संकलन १०.४४ लाख कोटी रुपये होते. मागील आर्थिक वर्षातील ८.३३ लाख कोटी रुपयांच्या संकलनापेक्षा हे २५.२३ टक्के अधिक आहे.

SL/ML/SL

22 April 2-24

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *