फ्लॅटच्या मेंटनन्स खर्चावर आता १८ टक्के GST

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने गृहनिर्माण नियमांमध्ये बदल केले असून गृहनिर्माण संस्थेच्या देखभालीसाठी दरमहा ७५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे देत असाल तर जीएसीटी द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारकडून गृहनिर्माण संस्थांच्या देखभालीवर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. मात्र हा नियम सरसकट सर्वांना लागू नाही. तुमच्या अपार्टमेंटला किती GST द्यावा लागेल हे पाहण्यासाठी स्थानिक कमर्शियल टॅक्स ऑफिसमध्ये ५००रुपयांचे शुल्क भरून माहिती घेता येईल.
सरकारने गृहनिर्माण संस्थांच्या नियमांमध्ये बदल केले असून याअंतर्गत अपार्टमेंटचा देखभाल खर्च दरमहा साडेसात हजार रुपयांपेक्षा जास्त आणि वर्षाला २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. मात्र, हा जीएसटी सरसकट लावला जाणार नाही, त्यासाठी मेंटनन्स मर्यादा लावली जाणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीकडे गृहनिर्माण सोसायटीमध्ये दोन किंवा अधिक फ्लॅट असतील आणि तो दरमहा प्रत्येकी ७५०० रुपये देखभालीचा खर्च भरतो, एकूण १५ हजार रुपयांपर्यंत मेंटनन्स भरत असाल तर त्याला प्रत्येक फ्लॅटसाठी कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही. त्यांना संपूर्ण रकमेवर जीएसटी भरावा लागेल.
SL/ML/SL
14 April 2025