साईबाबा संस्थानाला 175 कोटी आयकर माफ

 साईबाबा संस्थानाला 175 कोटी आयकर माफ

शिर्डी,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील साईबाबा संस्थानला‍ आयकर विभागाकडून आयकरात 175 कोटी रुपयांची कर माफ करण्यात आलीय. आयकर विभागाने साई संस्थान हे धार्मिक ट्रस्ट नसून धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरला होता. त्यामुळं दानावर 30% आयकर आकारणी करण्यात आली होती.

प्राप्तिकर विभागाने २०१५-१६ या वर्षाचे करनिर्धारण करताना साईबाबा संस्‍थान हा धार्मिक ट्रस्‍ट नसून धर्मादाय ट्रस्‍ट गृहीत धरला होता. त्यामुळे दक्षिणापेटीत आलेल्‍या देणगीवर ३० टक्‍के आयकर आकारणी करुन १८३ कोटी रुपये कर भरणा नोटीस दिली होती. प्राप्तिकर विभागाने मागील दोन वर्षांच्या दक्षिणापेटीतील दानावर आयकर आकारणी केली नव्‍हती. तथापि, या निर्णयास अनुसरुन मागील दोन वर्षांच्या दक्षिणापेटीत रकमेवरही आयकर आकारणीचा निर्णय घेतला. संस्‍थानला तशी नोटीस पाठविण्यात आली. संस्‍थानमार्फत उच्‍च न्‍यायालय व सर्वोच्‍च न्‍यायलयात रिट अर्ज दाखल करण्‍यात आले होते.

 मागील तीन वर्षांत आकारणी करण्‍यात आलेल्‍या १७५ कोटी रुपयांची सूट संस्थानला मिळाल्याने पैसे वाचले आहेत.संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या प्रयत्नातून ही कायदेशीर लढाई संस्थानने जिंकली आहे.

SL/KA/SL

25 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *