विधानसभेत आज १७३ सदस्यांचा शपथविधी…

 विधानसभेत आज १७३ सदस्यांचा शपथविधी…

मुंबई, दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंधराव्या विधानसभेचे नव्याने सदस्य झालेल्या 173 आमदारांना आज सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. काल दुपारी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आज सभागृहामध्ये 173 सदस्यांना आज ही शपथ दिली.

विधानसभेची सदस्य संख्या 288 असून कालिदास कोळंबकर वगळता उर्वरित 287 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ घ्यायची असते त्यानुसार आज प्रथम पिठासीन अधिकारी म्हणून निवडलेल्या चैनसुख संचेती, माणिकराव कोकाटे, आशिष जयस्वाल, आणि जयकुमार रावल या चौघांना सदस्यत्वाची शपथ आधी देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मग दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.

आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्या 173 सदस्यांपैकी सात जणांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली तर एकाने सिंधी भाषेत तर एकाने उर्दू भाषेत शपथ घेतली. संस्कृतमध्ये शपथ घेणाऱ्यांमध्ये गिरीश महाजन ,सीमा हिरे, प्रताप अडसड ,नितेश राणे, सुधीर गाडगीळ ,प्रशांत ठाकूर आणि राम कदम यांचा समावेश होता तर कुमार आयलानी यांनी सिंधी भाषेत शपथ घेतली आणि एम आय एम चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी उर्दू भाषेत शपथ घेतली.

आजच्या पहिल्या दिवशी कामकाजावर काँग्रेसच्या सदस्यांनी बहिष्कार घातला होता मात्र शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांचे सदस्य सभागृहात उपस्थित होते. याखेरीज समाजवादी पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि एमआयएम यांचे सदस्य देखील सभागृहामध्ये उपस्थित होते. शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सदस्य सुरुवातीला अर्धा तास सभागृहात थांबून नंतर सभागृहाबाहेर निघून गेले.

ML/ ML/ SL

7 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *