17 नबर ची खोली सावरकर जयंतीनिमित्त आज खुली

 17 नबर ची खोली सावरकर जयंतीनिमित्त आज खुली

पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):– स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहातील 17 क्रमांकाची खोली सावरकर जयंतीनिमित्त आज सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली…आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या नंतर सर्वाना दर्शन घेण्यासाठी ही खोली उघड़ण्यात आली ..यावेळी दर्शाना साठी मोठी गर्दी पहायला मिळाली. यावेळी सावरकराचे नातू सत्यकी अशोक सावरकर उपस्थित होते. ..यावेळी सत्यकी सावरकर आपले विचार मंाडताना म्हणाले – विरोधकाना प्रतिउत्तर देण्यासाठी यांच बरोबर हिंदुत्व जपण्यासाठी सावरकरचे विचार लोकाच्या पर्यंत पोहोचले पाहीजे.. यासाठी सावरकर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. .. हिंदुत्व टिकवायचे असेल तर सावरकर याच्या विचारांचा प्रचार प्रसार केला पाहिजे. नवीन पीढ़ीला त्यांचे विचार समजले तर हिंदुत्व टिकेल असे मत या वेळी सत्यकी सावरकर यांनी मांडलेस्वातंत्र्यवीर सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाचे विदयार्थी म्हणून सन १९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये रहात होते. त्यांच्या वापरातील विविध वस्तूंचे या ठिकाणी जतन करण्यात आले आहे. ही वास्तू सावरकर जयंती तसेच पुण्यतिथि निमित्त नागरिकांना दर्शनासाठी खुली करण्यात येते.. या खोली मधे त्यांचे काही कपडे, बेड जतन करण्यात आले आहे. याच बरोबर या ठिकाणी त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. त्यांनी शिवाजी महाराजा वरती केलेली आरती या ठिकाणी लवण्यात आली आहे. याच बरोबर काही ऐतिहासिक फोटो चे कोलाज करण्यात आले आहे…

ML/KA/PGB 28 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *