सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळुन १६ भारतीय जवानांचा मृत्यू

 सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळुन १६ भारतीय जवानांचा मृत्यू

गंगटोक, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज उत्तर सिक्कीममधील झेमा येथे झालेल्या दुर्घटनेत 16 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे वाहन दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जवान जखमी झाले आहेत.  स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात यश आलंय. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ सैनिकांसह एकूण १६ जवानांना मृत्यू झाला आहे.

आज सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे वळणावर मोठा उतारा होता. तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जवानांची बस दरीत कोसळली.

23 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *