रशियन सैन्यात भरती झालेले 16 भारतीय बेपत्ता

 रशियन सैन्यात भरती झालेले 16 भारतीय बेपत्ता

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियन सैन्यात भरती होऊन युक्रेन युद्धात सामील झालेल्या 16 भारतीय नागरिकांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे समोर आले आहे. तर या युद्धात आतापर्यंत 12 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) दिली. केरळचा रहिवासी असलेल्या बिनील बाबू या भारतीय व्यक्तीचा युक्रेनमधील संघर्षात मृत्यू झाला आहे. तर जैन टी. के. नावाचा दुसरा भारतीय नागरिक जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीचे मॉस्कोमध्ये उपचार सुरू असून उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात परत आणले जाणार आहे.

MEA प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियामध्ये कार्यरत राहिलेल्या भारतीय नागरिकांच्या लवकर सुटकेची मागणी भारताने पुन्हा केली आहे. केरळमधील बिनील बाबू यांच्या मृत्यूसंदर्भातही भारतीय दूतावास रशियन अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे, तसेच त्यांच्या पार्थिव अवशेषांच्या भारतात परतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

रशियन सैन्यात 126 भारतीय नागरिक भरती झाले होते. यांपैकी 96 नागरिक भारतात परतले. 12 भारतीयांचा मृत्या झाला आहे. सध्या रशियन सैन्यात 18 भारतीय कार्यरत आहेत. भारतीयांचा ठावठिकाणा माहिती नाही अशा लोकांना रशियाने त्यांना बेपत्ता या गटात टाकले असून अशा भारतीय नागरिकांची संख्या 16 इतकी आहे.

SL/ML/SL

23 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *