संत्रवर्गीय फळांच्या नुकसान भरपाईसाठी १५६ कोटी रु. मंजुर
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारने जुलै ते ऑगस्ट २०२४ मधील चार जिल्ह्यात झालेल्या संत्रावर्गीय फळ पिकांच्या नुकसान मदतीसाठी १६५ कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. यामध्ये नागपूर विभागातील वर्धा आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या मदतीचा शासन निर्णय आज प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी विभागात ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या नुकसानीसाठी १० कोटी ८४ लाख ९८ हजार रुपयाचे प्रस्ताव नागपूर विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवले होते. तर अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळीमुळं झालेल्या नुकसान मदतीसाठी १५४ कोटी ९८ लाख १० हजार रुपयांच्या निधीचे प्रस्ताव अमरावती विभागीय आयुक्तांनी पाठवले होते. या दोन्ही प्रस्तावाला एक वेळची विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून मंजूर देण्यात आली आहे.
SL/ML/SL
21 Jan. 2025