१५ हजार फुटावर साकारली शिवाजी महाराजांची रांगोळी
अकोला, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचे वर्ष शिवराज्याभिषेकाचे साडेतीनशे वे वर्ष असून शिवजयंतीचे औचित्य साधत अकोला जिल्हयातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात चतुर्भुज आर्ट्सचे रांगोळी कलाकार अनिल काळे आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून तब्बल 15 हजार स्क्वेअर फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
ड्रोन कॅमेऱ्यातून दिसणारी ही 100 फूट बाय 150 फूट भव्य रांगोळी तब्बल 15 हजार स्क्वेअरफूट मध्ये साकारण्यात आली असून यासाठी दहा रांगोळी कलाकारांना तब्बल चार दिवस लागले तर र 40 क्विंटल रांगोळीचे रंग लागले आहेत. शिवाजी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात शिवजयंती सप्ताह निमित्त ही रांगोळी साकारन्यात आली असून अकोला जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची ही आजवरची सर्वात मोठी रांगोळी म्हणता येईल.
आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रांगोळीला पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. शिव सप्ताहाच्या निमित्ताने अकोट येथील शिवाजी महाविद्यालयात जिवंत शिवसृष्टी उभारण्यात आली असून शिवसृष्टी मध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग साकारले आहेत.
ML/KA/SL
18 Feb. 2024