अवैध रेती उपसा करणाऱ्या 15 बोटी केल्या उध्वस्त…

बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील इसरूळ आणि सिनगाव जहांगीर भागातून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदी तसेच धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी यांनी धडक कारवाई करत रेती उपसा करणाऱ्या 15 बोटी जिलेटीनंच्या साहाय्याने स्फोट करत उध्वस्त केल्या आहेत..
यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तीन तर जाफराबाद तालुक्यातील 12 बोटींचा समावेश आहे त्यामुळे रेती उपसा करण्याऱ्यामध्ये दहशत पसरली आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी वाढली होती जिल्ह्यात तीन तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता, एक तलाठी गंभीर जखमी असून उपचार घेत आहे, अश्यातच जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलत खडकपूर्णा धरण, नदी परिसरातील 15 बोटी उध्वस्त केल्या आहेत.
ML/ML/SL
23 Jan. 2025