१४ व्या शिवार साहित्य संमेलनाला सुरुवात
बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यामधील माजलगावात १४ व्या शिवार साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच साहित्यिकांचा सहभाग होता.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगाव शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोरेश्वर महाविद्यालय, गंगामसला (मोरेश्वर साहित्य नगरी) मध्ये संपन्न झाले आहे. ग्रामीण भागामध्ये साहित्य चळवळ रुजवी म्हणून शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. मागील तेरा वर्षांपासून शिवार साहित्य संमेलन भरवले जात आहे.
प्रत्यक्ष शिवारावर जाऊन ग्रामीण भागात जे काही साहित्यिक असतील कवी असतील यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावं त्यांची जी प्रतिभा आहे ही सर्वांसमोर यावी या उद्देशाने साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे.
ML/KA/SL
12 March 2023