अडकलेल्या जहाजातून १४ खलाशांची सुखरूप सुटका

अलिबाग, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अलिबाग किल्ल्याजवळ भरकटलेल्या स्थितीत अडकलेल्या JSW कंपनीच्या जहाजावरील खलाशांचे सेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आले आहे. रात्रभर जहाजावर अडकलेल्या सर्वच्या सर्व १४ खलाशांची कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टर च्या साहाय्याने सुटका करण्यात आली. काल समुद्रात उसळलेल्या मोठ्या लाटांनी हे जहाज भरकटले होते. या जहाजाचे इंजिन ही बंद पडल्याने त्याची हालचाल थांबली होती. यात अडकलेल्या खलाशांना आता बाहेर काढण्यात आले आहे, सर्व खलाशी सुखरूप आहेत.
PGB/ML/PGB
26 July 2024