नेपाळमधील घटनेत जळगाव तालुक्यातील १४ जणांचा मृत्यू

 नेपाळमधील घटनेत जळगाव तालुक्यातील १४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये 41 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. त्यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. जळगावमधून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार असून मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *