लोअर परेलमध्ये लिफ्ट कोसळून तीन महिलांसह 14 जखमी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील लोअर परेल भागात सकाळच्या सुमारास एका 16 मजली इमारतीची 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन महिलांसह 14 जण जखमी झाले असून जखमींना ग्लोबल व के ई एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.14 injured including three women in lift collapse in Lower Parel
लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील कमला मील परिसरातील ट्रेड वर्ल्ड टॉवरच्या सी विंगमध्ये आज सकाळी १०.४९ च्या सुमारास एक लिफ्ट 4थ्या मजल्यावरून खाली कोसळली.या अपघातात १२ ते १४ जण जखमी झाले आहेत.जखमींना सुरक्षा रक्षकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी ८ जणांना परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल केले आहे.
यामध्ये प्रियंका चव्हाण (26), प्रियांका पाटील व तृप्ती कुबल (46), या तीन महिलांसह प्रतीक शिंदे (26),अमित शिंदे(25), मोहम्मद रशीद (21), सुधीर सहारे (29),मयूर गोरे (28) यांचा समावेश आहे. या 8 जणांची प्रकृती स्थिर आहे.तर
केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेले किरण विश्वनाथ चौकेकर (४८) यांची ही
प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. अन्य 4 किरकोळ जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यास नकार दिला आहे.
ML/KA/PGB
21 Jun 2023