या राज्यातून पाच वर्षांमध्ये 13 हजार 552 व्यक्तींचे अपहरण

 या राज्यातून पाच वर्षांमध्ये 13 हजार 552 व्यक्तींचे अपहरण

बंगळुरु, दि. 20 : कर्नाटक राज्यात अपहरणांच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 13 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते आणि नंतर त्याची हत्या झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. गेल्या 5 वर्षात राज्यात 13 हजार 552 लोकांचे अपहरण झाले असल्याचे समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे यात 9789 महिला आहेत. तसेच 2025 च्या पहिल्या सात महिन्यांत राज्यात 1318 लोकांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. यातीस सर्वाधिक 589 लोक राजधानी बेंगळुरूमधून गायब झाले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधान परिषदेत लेखी उत्तर देताना याबाबत माहिती दिली आहे, त्यामुळे हा आकडा समोर आला आहे.

कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपचे विधान परिषदेचे सदस्य सी.टी. रवी यांनी लहान मुलांच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ‘सध्या सीसीटीव्हीसारखे आधुनिक तंत्रज्ञान असूनही अपहरणाच्या घटना वाढत आहेत. याबाबत उपाय शोधण्यासाठी सरकारने जिल्हा आणि तालुका पातळीवर बैठका आयोजित करायला हव्यात असंही रवी यांनी म्हटलं आहे. आता सरकार अशा घटना रोखण्यासाठी काय पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *