बारावीचा निकाल जाहीर, सविस्तर निकाल

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रात आज (21 मे ) दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाला आहे. या परीक्षेचा राज्याचा निकाल 93.37 % लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.44 टक्के तर मुलांचा निकाल 91.60 टक्के लागला आहे. बोर्डाने केवळ सध्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालात त्यांचा सविस्तर निकाल पाहता येणार आहे. दरम्यान श्रेणीसुधार परीक्षा जुलै महिन्यामध्ये होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल 2% पेक्षा अधिक आहे. 26 विषयांचा निकाल 100% लागला आहे.
निकालाची ठळक वैशिष्टये
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, वाणिज्य व नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५, ४४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५,०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२,४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.
३. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१,३६२ एवढी असून त्यापैकी ४०,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.
५. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ( ९१.९५%) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९५.४४% असून मुलांचा निकाल ९१.६० % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४% ने जास्त आहे.
८. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० % आहे.
फेब्रुवारी – मार्च २०२३ चा निकाल ९१.२५ टक्के होता. फेब्रुवारी-मार्च २०२३
च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च २०२४ चा निकाल २.१२ टक्के जादा आहे.
(ड) खेळाडू, एन.सी.सी., स्काऊट / गाईड विद्यार्थ्याना सवलतीचे गुण
सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी तसेच १००% गुणांच्या अधीन राहून शासन निर्णयानुसार सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत.
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून एन.सी.सी. व स्काऊट गाईड च्या पात्र विद्यार्थ्यांना दि.२०/१२/२०१८ व २५/१/२०१९ च्या शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत. त्यानुसार २०९९० पात्र विद्यार्थ्यांना क्रीडा, एन.सी.सी. व स्काऊट गाईड यापैकी उच्चतम असणाऱ्या एकाच क्षेत्रासाठीचे सहभागाचे / प्राविण्याचे गुण देण्यात आलेले आहेत.
(इ) श्रेणीसुधार / गुणसुधार योजना परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत फक्त लगतच्या दोनच परीक्षांमध्ये पुनःश्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी – मार्च २०२४ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या ) जुलै – ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी – मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस
‘श्रेणी सुधार’ साठी प्रविष्ट होण्यास दोन संधी देण्यात येत आहेत.
(ई) निकालाची कार्यपध्दती
१. मंडळामार्फत प्रथम ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील निकालाचा ताण कमी होण्यास मदत होते व निकाल ऑनलाईन पध्दतीने लवकर समजल्यामुळे विद्यार्थी व पालकांना भविष्यकालीन शिक्षणाच्या प्रवेशाबाबत नियोजन करण्यास त्यांना अवधी मिळत असल्याने मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२ वी ) परीक्षेचा
निकालही ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे.
२. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार, दि. २१/०५/२०२४
रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे. मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर निकालाची ऑनलाईन प्रत (प्रिंटआऊट) घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ML/ML/PGB 21 May 2024