भुसावळहून कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या १२ ट्रेन रद्द

भुसावळ, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची पर्वणी साधण्यासाठी आता अवघा आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजकडे गर्दी करत आहेत. अती गर्दीचे नियोजन अयशस्वी ठरल्याने चेंगराचेगरीच्या घटना घडल्यामुळे आधीच काही भाविकांच्या मृत्यू झाला आहे.त्यामुळे आता प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याचा परिणाम इतर रेल्वेगाड्यांवर झाला. त्यामुळे भुसावळवरून महाकुंभ मेळाव्याला जाणाऱ्या १२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
२० फेब्रुवारीला छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. छपरा-सूरत ताप्ती गंगा एक्सप्रेस, बलिया – दादर त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेस, गोरखपूर ते सीएसटी एक्स्प्रेस २१ फेब्रुवारीला रद्द केली गेली आहे. दादर-बलिया त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेस आणि दादर – गोरखपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – छपरा एक्स्प्रेस १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस १८ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत रद्द केली आहे. अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस २० आणि २७ फेब्रुवारीला रद्द केली आहे. सूरत-छपरा ताप्ती गंगा एक्स्प्रेस १९ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.
SL/ML/SL
19 Feb. 2025