गुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून १२ जणांचा मृत्यू
गुजरातमधील मोरबी येथील हळवद जीआयडीसी येथे बुधवारी सकाळी मीठ कारखान्याची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना मोठा फटका बसला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर अनेक जण गाडले गेल्याची भीती आहे. बचाव पथके घटनास्थळी असून भिंतीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.