नदीपात्रात अडकलेल्या १२ मासेमारांची हेलिकॉप्टरने सुटका…
नाशिकदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदी पात्रात अडकलेल्या बारा मासेमारांची सुटका हेलिकॉप्टरने करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच रविवारी गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेले १२ जण अडकल्याची घटना घडली.
नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हे १२ जण तब्बल १५ तासांहून अधिक कालावधी उलटूनही नदीपात्रातून अडकले होते. आता या १२ जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे नदीत अडकलेल्या १२ जणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या १२ जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले होते. त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे पुरात अडकलेल्या १२ जणांना वाचवण्यासाठी अडचणी येत होत्या.
१२ तरुणांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले तब्बल १५ तासांहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही १२ जणांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढता आलेले नव्हते. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ (SDRF) जवानांचे या १२ जणांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने तरुणांना बाहेर काढण्यास अडथळे निर्माण होत होता. नाशिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अडकलेल्या तरुणांना जेवण पोहचवण्यात आले. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून या १२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
ML/ ML/ SL
5 August 2024