परदेशात उच्च शिक्षण, शिष्यवृत्तीचे 12 कोटी मंजूर

 परदेशात उच्च शिक्षण, शिष्यवृत्तीचे 12 कोटी मंजूर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले आहेत. इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी २०२३-२४ मध्ये ५० ओबीसी विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यातील या वर्षातील बॅचमधील ३२ तर मागील बॅचमधील २ विद्यार्थांना १२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा नक्की लाभ होईल, असा विश्वास इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे. 12 crores sanctioned for higher education abroad, scholarships

ML/KA/PGB
13 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *