5G मुळे भारतातील इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये 115 टक्के वाढ

 5G मुळे भारतातील इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये 115 टक्के वाढ

मुंबई,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपली 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये ५जी नेटवर्क सुरु झाले आहे. सध्या नेटवर्क स्पीड टेस्ट साईट असणाऱ्या Ookla च्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारतात 5G सर्व्हिस अत्यंत वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत 5G बाबतीत रशिया, अर्जेटिना, मेक्सिको, श्रीलंक , बांगलादेश, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांच्या पुढे गेला आहे. Ookla ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील डाउनलोड स्पीड गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १३.८७ Mbps वरून ११५ टक्क्यांनी वाढून या वर्षी जानेवारीमध्ये २९.८५ Mbps इतका झाला आहे.

जानेवारी २०२३ मध्ये भारत इंटरनेट स्पीडच्या बाबतीत ६९ व्या स्थानावर होता परंतु भारतात ५जी च्या वेगामुळे भारत ४९ व्या स्थानावर पोहोचला Reliance Jio आणि Airtel 5G यांच्या स्पीडची तुलना करताना Ookla ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जानेवारी २०२३ मध्ये jio ५जी सर्व्हिस वापरणाऱ्या वापरकर्त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये २४६.४९ Mbps चा सरासरी डाउनलोड स्पीड मिळाला. तसेच तो कोलकात्यामध्ये ५०६.२५ Mbps इतका स्पीड नोंदवला गेला आहे.
दरम्यान टेलिकॉम कंपनी असणाऱ्या VI म्हणजेच वोडाफोन-आयडियाचे २०२२या वर्षांमध्ये वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी झाली आहे. ५ जी सर्व्हिस सुरु झाल्यानंतर वापरकर्ते मोठ्या प्रमाणात VI सर्व्हिसकडे दुर्लक्ष करत आहेत, Ookla च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

SL/KA/SL
1 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *