ठाणे जिल्हातील ११२ पर्यटक नेपाळच्या दंगलीत अडकले ..

 ठाणे जिल्हातील ११२ पर्यटक नेपाळच्या दंगलीत अडकले ..

ठाणे दि १०:– नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी आणली आणि त्याविरोधात हजारो युवकांनी जोरदार आंदोलन केलं. काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनला हिंसक वळण लागलं नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर झाली असून ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यातील ११२ पर्यटक नेपाळमध्ये सुरु असलेल्या दंगलीत अडकून पडल्याची माहिती मुरबाडचे आमदार किशन कथोरे यांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील रहिवासी असलेले ११२ पर्यटक नेपाळमधील दंगलीमुळे नेपाळमध्येच भीतीच्या छायेखाली हॉटेलमध्ये वास्तव करीत असून त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांच्याशी संवाद साधून या पर्यटकांची परतीच्या प्रवासाची सुखरूप पणे सुटका व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहे अशी माहितीही आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे

खळबळजनक बाब म्हणजे 112 पर्यटकापैकी 47 पर्यटक हे दंगलखोरांचा उद्रेक असलेल्या काठमांडू शहरातील एका हॉटेलमध्ये आतापर्यंत सृखरूप आहेत. तर 65 पर्यटक पोखरण या शहरात एका हॉटेलमध्ये भीतीच्या छायाखाली असून या सर्व पर्यटकांनी आमदार किसन कथोरे यांच्याशी मोबाईलवर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क साधून नेपाळमधील घटनेची माहिती दिली आहे. तसेच आमचे इथून लवकरात लवकर घरवासी करा अशी विनंती देखील त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे केली आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *