केरळमध्ये एकाच दिवसात आढळले कोरोनाचे १११ रुग्ण

 केरळमध्ये एकाच दिवसात आढळले कोरोनाचे  १११ रुग्ण

थिरुवनंतपुरम्, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात आता हिवाळ्याची चाहुल सुरु झालेली असतानाच कोरोनाच्या राक्षसाना आता हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक परिणाम केरळमध्ये दिसून येत आहे. केरळमध्ये काल एकाच दिवशी कोविड-19 चे 111 नवीन रुग्ण आढळल्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,634 वर पोहोचली आहे. त्यामुळेच केरळच्या शेजारील राज्ये कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगत आहेत, तर केंद्र सरकारनेही याबाबत राज्यांना सतर्क केले आहे.

केरळमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेली वाढ आणि JN.1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्राने सोमवारी राज्यांना अॅडव्हायजरी जारी कडून कोविड परिस्थितीवर राज्यांनी सतत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 127 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 111 प्रकरणे एकट्या केरळमधील आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यासह गेल्या तीन वर्षांत राज्यातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 72,053 वर पोहोचली आहे.केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेली वाढ आणि JN.1 प्रकारातील पहिल्या प्रकरणांवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि सहयोगी कार्यामुळे आपण COVID-19 प्रकरणांची संख्या कमी करू शकलो. परंतु कोविड-19 विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी गती कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.

SL/KA/SL

19 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *