दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव

 दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव

मुंबई, दि. ११ : दहीहंडी उत्सव अगदी चार दिवसांवर आल्याने उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. यातच एक धक्कादायक घटना घडली आहे. दहिहंडीचा सराव सुरू असताना 6 व्या थरावरून कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. हा चिमुकला गोविंदा नवतरुण मित्र मंडळ पथकातील सदस्य होता. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे नवतरूण मित्रमंडळाचे पथक गोविंदाचा सराव करत होते. या पथकात महेश रमेश जाधव या चिमुकल्या गोविंदाचा समावेश होता. पथकाने 6 थर लावले होते. महेश 6 व्या थरावर चढला होता. रात्री पावणे दहाच्या सुमारास तो 6 व्या थरावरून कोसळला. पण त्याला झेलण्याच्या आत तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी दहिसर पूर्वेच्या प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *