GST संकलनात गतवर्षाहून 11 टक्के वाढ

 GST संकलनात गतवर्षाहून 11 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच सरकारीच्या आर्थिक स्थिती बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मासिक आधारावर विचार केला तर आतापर्यंतची ही दुसरी मोठी आकडेवारी आहे. 23-24 या आर्थिक वर्षात 20.14 लाख कोटी रुपये GST संकलन झालं आहे, जे 22-23 च्या तुलनेत 11.7 टक्के अधिक आहे.

मार्चमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त जीएसटी संकलन झाले आहे. सरकारकडून जीएसटी संकलनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मार्चमध्ये जीएसटी संकलन 11.5% ने वाढून 1.78 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जीएसटी संकलनात ही वाढ देशांतर्गत व्यवहारांमध्ये 17.6% वाढ झाल्यामुळे झाली आहे.

मार्च महिन्यातील रिफंडवरील निव्वळ जीएसटी महसूल 1.65 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 18.4 टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षातील मासिक आधारावर सरासरी GST संकलनाची गणना केली तर 2023-24 या आर्थिक वर्षात 1.68 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये 1.5 लाख कोटी रुपये होते.

गत 6 महिन्यांत GST संकलन

ऑक्टोबर, 2023: ₹1.72 लाख कोटी

नोव्हेंबर, 2023: ₹1.67 लाख कोटी

डिसेंबर 2023: ₹1.65 लाख कोटी

जानेवारी, 2024: ₹1.72 लाख कोटी

फेब्रुवारी, 2024: ₹1.68 लाख कोटी

मार्च, 2024: ₹1.78 लाख कोटी

SL/ML/SL

1 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *