10 वी, 12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12 वी आणि 10वीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. 12ची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 10 वीची लेखी परीक्षा ही 02 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल.
इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इयत्ता १२ वी व इयत्ता १० वी ची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेले आहेत.
ML/KA/SL
31 Dec. 2022