अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची १० कोटींची मदत

 अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची १० कोटींची मदत

मुंबई दि २९ : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचं व नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

या पार्श्वभूमीवर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी माहिती देताना सांगितले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी ट्रस्टकडून तातडीने १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्रावर संकटाचं सावट आलं की, ट्रस्ट नेहमीच पुढे येऊन मदतीसाठी उभा राहिला आहे. आता पुन्हा एकदा या निर्णयामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *